नुकत्याच ‘न्यू वर्ल्ड हेल्थ’तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात जगातील एकूण 15 श्रीमंत शहरांची नावे प्रसिद्ध करण्यात आली. या अहवालानुसार मुंबई जगात 12 व्या क्रमांकावरील श्रीमंत शहर आहे. यामध्ये . मुंबईची संपत्ती आहे, 950 बिलियन डॉलर म्हणजे अंदाजे 61,12,775 कोटी रुपये.
या श्रीमंत शहरांच्या यादीत न्यूयॉर्कने पहिला क्रमांक पटकावला असून या शहराची संपत्ती 3 ट्रिलियन डॉलर म्हणजे अंदाजे 193 लाख कोटी रुपये आहे. तर दुसऱ्या स्थानावर लंडनआणि तिसऱ्या स्थानावर टोकियो (जपान) आहे.
तब्बल 83 वर्षांनी बडोदे (गुजरात) येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना होत आहे.
बडोदा येथे यापूर्वी 1909 मध्ये लेफ्टनंट कर्नल डॉ. कीर्तिकर यांनी, 1921 मध्ये साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी तर, 1934 च्या अखेरीस ना. गो. चापेकर यांनी ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
चाबहार बंदरासह नऊ करारांवर स्वाक्षऱ्या
इराणचे अध्यक्ष हसन रुहानी शनिवारी भारताच्या भेटीवर आले असून दहशतवाद, सुरक्षा, व्यापार व ऊर्जा या विषयांवर दोन्ही देशांनी नऊ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यात 18 महिन्यांसाठी चाबहार बंदराचा काही भाग भाडेतत्त्वावर चालवण्यास घेण्याच्या कराराचा समावेश आहे.
आजवर निवडणुकीचा अर्ज भरताना उमेदवारांना त्यांचे उत्पन्न जाहीर करावे लागत होते. मात्र आता तेवढय़ाने भागणार नाही. उमेदवारांना त्या उत्पन्नाचा स्रोतही जाहीर करावा लागेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. अनेक राज्यांत नजीकच्या भविष्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर या निर्णयाला महत्त्व आहे.
तशा स्वरूपाची मागणी करणारी याचिका लोक प्रहरी या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने तिचे सरचिटणीस एस. एन. शुक्ला यांनी दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला.