'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
- के. पी. शर्मा ओली यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. सीपीएन माओवादी पक्षासोबतच्या ओली यांच्या डाव्या आघाडीने संसदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर या देशात राजकीय स्थैर्य प्रस्थापित होईल, अशी आशा पल्लवित झाली आहे.
- राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी यांच्यासह सीपीएन- यूएमएलच्या दोन इतर मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ओली हे नेपाळचे 41 वे पंतप्रधान आहेत.
- चीनधार्जिण्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे ओली यांनी यापूर्वी 11 ऑक्टोबर 2015 ते 3 ऑगस्ट 2016 या कालावधीत देशाचे पंतप्रधानपद भूषविले होते.
- इस्रायलमधील पोलिसांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या विरोधात खटला चालवण्याची शिफारस केली असून याबाबतचा अंतिम निर्णय आता अॅटर्नी जनरल घेणार आहेत.
- देशातील 50 कोटी जनतेला विम्याचे कवच देणाऱ्या मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान योजनेतून पश्चिम बंगालने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने राज्यांशी चर्चा न करताच ही योजना आणल्याचा आरोप करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
- आयुष्मान योजनेसाठी 60 टक्के तरतूद केंद्र सरकार करणार आहे. तर उर्वरित 40 टक्के तरतूद राज्य सरकारला करावी लागणार आहे. या योजनेत प्रति व्यक्तीमागे सरकारला1100 रुपये खर्च अपेक्षित आहे.
- घरबसल्या एका क्लिकवर आता तुम्हाला तुमचे नाव एका अॅप्लिकेशनद्वारे मतदार यादीत समाविष्ट करता येणार आहे. ERONET (Electoral Rolls Services NeT) असे या अॅप्लिकेशनचे नाव असेल. निवडणूकीच्या प्रक्रियेमध्ये डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी हे अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. यावर मतदार कार्डाच्या नोंदणीची, पत्ता आणि नाव बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदारांना या कामांसाठी मतदार केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही.