चालू घडामोडी 14 फेब्रुवारी 2018
- अवकाशवीरांनी प्रथमच अवकाशस्थानकात बॅडमिंटनचा सामना खेळला.

- रशियाच्या रॉसकॉसमॉस या अवकाश संशोधन संस्थेने त्याचा व्हिडिओ जारी केला असून त्यात रशिया, अमेरिका, जपानचे अवकाशवीर सहभागी होते.
- अवकाशात बॅडमिंटनचा सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ होती.
- रशियाचे अवकाशवीर अलेक्झांडर मिसुरकिन व अँटन शाकापलेरोव विरुद्ध अमेरिकेचा मार्क व्हँड हेइ व जपानचा नोरिशिंगे कनाई यांच्यात हा सामना झाला.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपले तिमाही पतधोरण जाहीर केले. ज्यामध्ये रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
- रेपो रेट 6 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के असाच कायम ठेवण्यात आला आहे.
- सलग तिसऱ्यांदा आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच व्याजदरांमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
- रेपो व रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
देशभरातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचं कर्ज घेतं त्यावेळी जो दर रिझर्व्ह बँक आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. तर ज्यावेळी बँका आपल्याकडचा अधिक असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करते, त्यावेळी जो व्याजदर आरबीआय देते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.
- गोवा सरकारने लोह खनिजाच्या खाणकामासाठी दिलेले 88 भाडेपट्टय़ाचे परवाने प्रक्रियात्मक नियमांचा भंग केल्याच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत.
- दुसऱ्यांदा नूतनीकरण केलेले हे भाडेपट्टे 15 मार्चपर्यंत लागू राहणार असून त्यानंतर ते बाद होतील असे न्या. मदन बी. लोकूर यांच्या नेतृत्वाखालील न्यायापीठाने सांगितले.
- सरकारची परवाने नूतनीकरणाची पद्धत ही कायद्याचे उल्लंघन करणारी असून या प्रकरणी एक विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात यावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
- पृथ्वीपासून 40 प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या ट्रॅपिस्ट -1 या लाल ताऱ्याभोवती एकूण सात पृथ्वीसदृश ग्रह सापडले असून तेथे जीवसृष्टीस आवश्यक असलेला पाणी हा घटक असण्याची शक्यता आहे, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.
- आपल्या सौरमालेबाहेर जीवसृष्टी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे वैज्ञानिकांचे मत आहे.
- ट्रॅपिस्ट 1 ग्रहमाला 2016 मध्ये सापडली असून त्याचे आणखी संशोधन करण्यात आले असता तेथे पृथ्वीसारखे सात ग्रह सापडले आहेत.
- ते पृथ्वीइतक्या आकाराचे असून त्यांची नावे ट्रॅपिस्ट 1 बी, सी,डी इ, एफ व एच अशी आहेत.
- युरोपियन सदर्न ऑब्झव्र्हेटरीत स्वित्झर्लंडच्या बर्न विद्यापीठाचे सिमॉन ग्रीम यांनी संगणकीय प्रारूपांच्या मदतीने हे संशोधन केले असून त्यात ग्रहांच्या घनताही ठरवल्या आहेत.